नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
एकीकीडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे वाढती महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. गॅस, पेट्रोल, डिझेल तसेच खाद्य तेल, कडधान्या या सर्वांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. जगायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधक देखील वारंवार देशातील या स्थितीवरून मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. आता सुप्रीम कोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी देखील वाढत्या मगागाईला दाखला देत “अच्छे दिन आ गये!” असे म्हणात मोदी सरकारला टोला लगावला आहे.
मार्कंडेय काटजू यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, डिझेल आणि पेट्रोल किंमती १०० रूपयाचा वर गेल्या आहेत. सरसोचे तेल २०० रूपये तर एलपीजी गॅस १००० रूपयांच्या जवळ गेला आहे. बेरोजगारी आणि बाल कुपोषण रेकॉर्ड मोडत आहेत, शेतकरी संकटात आहे, अर्थव्यवस्था बुडत आहे तसेच आरोग्याची देखील योग्य काळजी घेतल्या जात नाही. ..आशा स्थितीमध्ये “अच्छे दिन आ गये” असा टोला सुप्रीम कोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी मोदी सरकारला लगावला आहे.
मार्कंडेय काटजू हे सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. विविध विषयांवर ते आपले मत व्यक्त करत असतात. आज देखील वाढत्या महगाईवरून त्यांनी केंद्र सरकारवर ट्वीटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या ट्वीटची चर्चा रंगली आहे.









