धरणात ४५% पाणीसाठा
पाटगांव / वार्ताहर
पाटगाव परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून पाटगाव मध्यम प्रकल्पाच्या मौनी सागर जलाशयातील पाण्याच्या पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात पाटगाव परिसरात २०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर, धरणात आत्तापर्यंत सुमारे ४५ टक्के पाणीसाठा झाला आहे. काही ठिकाणी पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून तालुक्यातील गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे काही अंशी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
तर पाटगाव मध्यम प्रकल्पातून विज निर्मितीसाठी 225 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असल्याने वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे.
पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा समाधानी झाला असून यावर्षी भाताची लावण लवकर होणार आहे. मात्र भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागात या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. काही भागातील वाडयावस्त्यावरील वीजपुरवठा खंडीत झाल्याने दुर्गम भागातील लोकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. अनेक ठिकाणी ओढ्याचे पाणी शेतात शिरल्याने शेतातील बांध वाहून गेले आहेत. मुसळधार पावसाने मौनी सागरजलाशयात गतवर्षीच्या तुलनेत ११ % पाणीसाठा जास्त आहे आज अखेर धरण परिसरात सुमारे एक हजार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे
Previous Articleजवानाच्या कुटुंबावर बहिष्कार
Next Article गौंडवाड ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन









