वेंगुर्ले / वार्ताहर-
वेंगुर्लेतील उभादांडा- मुठवाडी समुद्र किनाऱ्यावर मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजता तुटून खराब झालेल्या जाळ्यात अडकलेल्या दोन आँलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवांना स्थानिक मच्छीमार युवकांनी जाळ्यातून सोडवून नैसर्गिक अधिवासात सोडत जीवदान दिले.
सदर दोन्ही अॉलिव रिडले जातीची कासवांना जाळ्यातून सोडविण्यासाठी युवा मच्छीमार हनुमंत आरावंदेकर, हर्षद तांडेल, संतोष तांडेल, रूपेश आरावंदेकर, संदीप गिरप, राजेश गिरप, बंटी केळूसकर यांनी परीश्रम घेतले.









