प्रतिनिधी / मोरजी
मोरजी पंचायत क्षेत्रातील टीका उत्सवात एकूण 506 नागरिकांनी लस घेतली , त्यात 90 वषीय मारिया परेरा यांचा समावेश आहे , यात तरुणांचा मोठा सहभाग होता .
केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य खात्यातर्फे गावागावात 100 टक्के नागरिकांनी कोरोना लस घ्यावी यासाठी टीका उत्सव आयोजित केला होता .
मोरजी येथील श्री कळस देव मांगर सभागृहात आयोजित केलेल्या कोरोना टीका उत्सवाची जनजागृती मोरजी पंचायत क्षेत्रातील एकूण 9 पंच सदस्य , सरपंच वैशाली शेटगावकर , उपसरपंच अमित शेटगावकर , पंच मुकेश गडेकर , विलास मोरजे , पवन मोरजे ,प्रकाश शिरोडकर , तुषार शेटगावकर , संपदा शेटगावकर , सुप्रिया पोके , मोरजी जिल्हापंचायत सदस्य सतीश शेटगावकर, माजी सरपंच धनंजय शेटगावकर , मंदार पोके , महिला मोर्चा भाजपाचा अध्यक्षा नयनी शेटगावकर आदींनी परिसरात जनजागृती करून जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन केले होते .
टीका उत्सवात एकूण 506 नागरिकांनी लाभ घेतला . यावेळी डॉक्टर मनस्वी आळवे , सदानंद शेटगावकर , कुशाजी नाईक , रंजिता शेटगावकर , प्राची कलशावकर या आरोग्य कर्मचाऱयांनी बरीच मेहनत घेतली .









