प्रतिनिधी / बेळगाव
जागतिक रक्तदान दिनानिमित्त रेडक्रॉस सोसायटीतर्फे बिम्स हॉस्पिटल येथे बिम्स ब्लड बँकेच्या सहकार्याने शहरातील रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ उपस्थित होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, बिम्सचे संचालक डॉ. उमेश कुलकर्णी, सीईओ आफ्रीन बानो, डॉ. रविंद्र पाटील, रेडक्रॉसचे जिल्हाध्यक्ष अशोक बदामी, सचिव डी. एन. मिसाळे व जिल्हा सर्जन डॉ. सुधाकर उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हाधिकाऱयांच्या हस्ते शिवलिंगप्पा कित्तूर, संजय पाटील, डॉ. पवन शर्मा, डॉ. श्रीकांत विरगी, सुरेंद्र अनगोळकर, संतोष दरेकर, बसवराज चिकमठ या रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना काळातसुद्धा या सर्वांनी उत्तम सेवा बजावून रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचविले. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. त्यांच्याच हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी डॉ. पाटील आर. यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. मिसाळे यांनी सूत्रसंचालन केले.









