सोमवारी 9 जणांचा मृत्यू तर 253 नवे बाधित
प्रतिनिधी / पणजी
नवीन कोरोना बाधितांची व बळींची संख्या कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला असून गेल्या 24 तासात म्हणजे सोमवारी कोरोनामुळे 9 जणांचे बळी गेले तर 253 जण नवीन रुग्ण सापडले. एकूण बळींची संख्या 2937 झाली असून सक्रिय कोरोना रुग्ण 4406 इतके आहेत.
सोमवारी दिवसभरात 36 जणांना हॉस्पिटलात दाखल करण्यात आले असून 217 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. दिवसभरात 720 जण बरे झाले असून 57 जणांना हॉस्पिटलातून घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत मिळून एकूण कोरोना बाधितांची संख्या 162721 झाली असून त्यातील 155378 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे.
ब्लॅक फंगसचे 25 रुग्ण, 11 जणांचा मृत्यू गोव्यात ब्लॅक फंगस (म्युकर मायकोसीस) रोगाच्या 25 रुग्णांची नोंद झाली असून त्यातील 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती गोमेकॉचे डिन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली आहे. एकूण 14 रुग्ण उपचार घेत असून कोरोना व इतर आजारामुळे 11 जणांचे बळी पडल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान गोव्यात 5-10 म्हणता म्हणता ब्लॅक फंगसचे रुग्ण 25 पर्यंत गेल्याने चिंता वाढलेली दिसत आहे. या वाढीव रुग्णांची पुरेशी माहिती गोमेकॉकडून देण्यात आलेली नाही. आता रुग्ण वाढल्यानंतर ती देण्यात आल्याने आश्चर्य प्रकट होत आहे.









