इस्रायलमध्ये उत्खनादरम्यान 1 हजार वर्षे जुनं अंड सापडलं आहे. जगातील सर्वात जुन्या अंडय़ांपैकी एक असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. चकित करणारी बाब म्हणजे अंड सुरक्षित मिळाले होते, जे सफाईदरम्यान तुटले आहे. इस्रायल आर्कलॉजिकल डिपार्टमेंटने या अविश्वसनीय शोधाबद्दल एक विस्तृत पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे.
सुमारे 1 हजार वर्षे जुने कोंबडय़ाचे अंडे यावने येथे पुरातात्विक उत्खननादरम्यान सापडले आहे. हे अंडे 10 व्या शतकातील असल्याचे सांगण्यात येत आहे. मध्य इस्रायलच्या यावनेमध्ये शहरी विकासाचा प्रकल्प सुरू आहे. यात उत्खननादरम्यान ही अंडी सापडली आहे.
इस्रायल आणि पूर्ण जगात हा अत्यंत दुर्लभ शोध असल्याचे उद्गार इस्रायलच्या आर्कलॉजिकिल डिपार्टमेंटचे तज्ञ डॉक्टर ली पेरी लाग यांनी काढले आहेत. हे अंड 10 व्या शतकातील एका ऐतिहासिक स्थळावर सापडले आहे. एक वर्षापर्यंत एका विशेष स्थितीत पडून राहिल्याने ते सुरक्षित राहिले. फेसबुकवर या अंडय़ाविषयी पोस्ट करण्यात आल्यावर एक हजाराहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.









