ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनच्या झांगवान जिल्ह्यातील शियान शहरात आज सकाळी गॅस पाईपलाईनचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शियान शहरात रविवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास गॅस पाईपलाईनचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, घटनास्थळाशेजारील इमारतींचा काही भाग पडला आहे, तर काही इमारतींना तडे गेले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.









