हुबळी/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत असताना उपचारासाठी ऑक्सिजनची कमतरता भासत होती. ऑक्सिजन अभावी रुग्णांचा जीव देखील गेला आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता सर्वच राज्यांना भासत होती. यांनतर राज्याला केंद्राकडून विशेष रेल्वेने ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. दरम्यान राज्यानेही ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता अनेक ठिकाणी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले. अनेक ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले देखील. असाच एक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प पीएसए टेक्नॉलॉजीच्यावतीने किम्सच्या आवारात उभारला आहे.
दरम्यान पीएसए टेक्नॉलॉजीच्यावतीने किम्सच्या आवारात द्रवरूप ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी व मंत्री जगदीश शेट्टर यांनी या प्लांटचे उद्घाटन केले. या प्लांटची १ हजार लिटर प्रतिमिनिट ऑक्सिजन निर्मितीची क्षमता आहे.