4.50 लाखांचा मुद्देमाल जप्त : अथणी पोलिसांची कारवाई : तीन तालुक्यांमध्ये सात गुन्हे केल्याचे उघडकीस
प्रतिनिधी / बेळगाव
अथणी, रायबाग, जमखंडी तालुक्मयात चोऱया, दरोडे घालणाऱया टोळीतील दहा दरोडेखोरांना अथणी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या जवळून साडेचार लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला असून या टोळीने तीन तालुक्मयात सात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अथणीचे पोलीस उपअधिक्षक एस. व्ही. गिरीश, मंडल पोलीस निरीक्षक शंकरगौडा बसनगौडर, पोलीस उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, व्ही. जी. आरेर, ए. ए. इरकर, पी. बी. नाईक, एम. बी. दोडमनी, बी. जे. तळवार, एस. एस. पाटील, एस. एन. डाबोळे, पी. सी. कंटीगोंड, होमगार्ड कुमार नाईक, प्रवीण कांबळे आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे.
या टोळीतील गुन्हेगारांनी अथणी, कुडची, हारुगेरी व जमखंडी ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात एकूण सात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या जवळून 1 लाख 45 हजार रुपये किंमतीचा दारुसाठा, एक कार, पाच मोटार सायकली असे एकूण 4 लाख 65 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. राजू बसाप्पा गळतगी (वय 25), संजू बसाप्पा गळतगी (वय 22), उमेश उर्फ पिंटू सदाशिव गड्डी (वय 19), रामचंद्र परसाप्पा बिसनाळ (वय 21), सिध्दराम श्रीमंत पाटील (वय 19), जयवंत बसाप्पा लगळी (वय 25), आकाश बसाप्पा लगळी (वय 19), सुनील शिवशंकर गड्डी (वय 19), महांतेश वसंत गळतगी (वय 29), शिवानंद रुद्राप्पा शिरगण्णावर (वय 27) अशी अटक करण्यात आलेल्या दहा जणांची नावे आहेत. ते रड्डेरहट्टी व आलकनूर येथील राहणारे आहेत.