न्यायालय, विशेष समितीची परवानगी घेऊन पोलिसांनी लावली अमलीपदार्थांची विल्हेवाट
प्रतिनिधी / बेळगाव
अमलीपदार्थ विक्री व तस्करी प्रकरणी आजवर जप्त केलेला 366 किलो गांजा शुक्रवारी नष्ट करण्यात आला. गुंजेनहट्टी येथे सरकारी नियमानुसार खड्डा खोदून गांजासाठा नष्ट करण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया झाली.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी गुंजेनहट्टी येथे ही प्रक्रिया झाली. यावेळी अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते. आगीत गांजा भस्मसात झाल्यानंतर तो खड्डा बुजविण्यात आला.
बेळगाव शहर व उपनगरांमध्ये वेगवेगळय़ा पोलीस स्थानकात
आजवर 366 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. यासंबंधी एकूण 77 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाची व विशेष समितीची परवानगी घेवून पोलिसांनी आजवर जप्त केलेल्या अमलीपदार्थांची विल्हेवाट लावली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वरि÷ अधिकारी गुंजेनहट्टी परिसरात तळ ठोकून होते.
जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदण्यात आला. त्या खड्डय़ात गांजासाठा पसरून ठेवण्यात आला. त्यानंतर वरि÷ अधिकाऱयांच्या उपस्थितीत तो पेटविण्यात आला. आग विझल्यानंतर मातीने तो खड्डा बुजविण्यात आला. जप्त केलेले अमलीपदार्थ असो किंवा मद्यसाठा असो त्याची विल्हेवाट लावताना नियमांचे पालन करावे लागते. बेळगाव पोलिसांनी सर्व नियमांचे पालन करुन गांजासाठा नष्ट केला आहे.