नवी दिल्ली /प्रतिनिधी
पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षा आयएनआय सीईटी २०२१ येत्या १६ जूनला घेण्यावर डॉक्टरांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी १६ जून रोजी घेण्यात येणारी आयएनआय सीइटी २०२१ परीक्षा सर्वोच्च न्यायालयाने महिनाभर लांबणीवर टाकली आहे. ही परीक्षा १६ जून रोजी घेण्याचा निर्णय मनमानी असून ही परीक्षा महिनाभर लांबणीवर टाकण्यात यावी असा आदेश न्यायालयाने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला दिला आहे.
न्या. इंदिरा बॅनर्जी व न्या. एम. आर. शहा यांनी पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षा आयएनआय सीईटी २०२१ येत्या १६ जूनला घेण्यासाठी डॉक्टरांनी याचिका दाखल केली होती. दरम्यान न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. कोरोना कामामुळे अनेक जण दूरच्या ठिकाणी असताना अशा प्रकारे १६ जूनला परीक्षा घेणे मनमानी आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वतीने आयोजित परीक्षेसाठी ८१५ जागांसाठी ८० हजार विद्यार्थी बसणार आहेत. या ८१५ जागा एम्स, जेआयपीएमइआर, पुद्दुचेरी व निमहंस, बेंगळूर, पीजीआयएमइआर, चंडीगड या संस्थांतील आहेत.