बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक युवा सशक्तीकरण व क्रीडा विभागाने बुधवारी सांगितले की, क्रीडापटूंसाठी दोन दिवसीय कोरोना लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. १० आणि ११ जून रोजी शहरात खेळाडूंना कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. बृह बेंगळूर महानगर पालिका, आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, कर्नाटक क्रीडा प्राधिकरण आणि कर्नाटक ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान आयोजित करण्यात आले आहे.)









