तुळस / वार्ताहर:
तुळस पांडेपरबवाडी येथील रहिवासी महेश वसंत साटम (४५) या तरुणाचा विहीरीत तोल जाऊन मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. ही घटना आज सकाळी १० वाजताच्या दरम्यान घडली. भातशेतीचा हंगाम जवळ आल्याने महेश त्याची बायको व मुले आपल्या शेतात साफसफाई करत होती. महेश हा शेतातील विहीरीवरील झाडी व वेली तोड़त असताना त्याचा तोल जाऊन तो विहीरीत पडला हे लक्षात येताच त्याच्या बायकोने व मुलांनी मदतीसाठी आरडाआेरड केली. मात्र विहीर लोकवस्तीपासून दुर असल्याने त्यांच्या मदतीला कुणी धावून येऊ शकले नाही. त्याला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यु झाला. या घटनेची खबर वेंगुर्ले पोलीसांत सरपंच शंकर घारे यांनी दिली. त्यानुसार वेंगुर्ले पोलीस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक रुपाली गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. तसेच मृतदेह वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याचा अधिक वेंगुर्ले पोलीस करीत आहेत.









