अक्षय कुमारच्या ‘ओ माय गॉड’चा लवकरच सीक्वेल येणार आहे. या चित्रपटातील कलाकारांची नावे निश्चित झाल्याचे समजते. अक्षयच्या ‘ओ माय गॉड2’मध्ये यावेळी यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी दिसून येणार आहेत. 2012 मध्ये प्रदर्शित प्रीक्वेलमध्ये परेश रावल यांनी एका सर्वसामान्य नागरिकाची भूमिका साकारली होती. तर अक्षय कुमारने देवाची भूमिका केली होती. नव्या चित्रपटाची संकल्पना तशीच असली तरीही वेगळे कथानक असणार आहे. पंकज त्रिपाठी यामी यात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. त्यांच्या लाइफमध्ये अक्षय कुमारची दिव्य एंट्री होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित राय करणार आहेत. या पूर्वी त्यांनी ‘रोड टू संगम’चे दिग्दर्शन केले आहे.

उत्तम कलाकार आणि कथानक असल्याने एक चांगला चित्रपट पहायला मिळणार आहे. यामी गौतम आणि अक्षय कुमार पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसून येणार आहे. अक्षयचे अनेक चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. तर यामीने अलिकडेच ‘उरी’चे दिग्दर्शक आदित्य धर यांच्यासोबत विवाह केला आहे.









