रेडी / प्रतिनिधी-
रेडी गावातून खनिकर्मसाठी सुमारे ८ कोटी रक्कम गेली असताना सुध्दा रुग्णवाहिका रेडी गावलाच मिळत नाही. हे दुर्दैव आहे. रेडी प्राथमिक आरोग्य केंद्राला खनिज विकास नॉब प्रमाणे रुग्णवाहिका न मिळल्यास या आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतचे सरपंच मिळून आंदोलन छेडतील असा इशारा रेडीचे सरपंच रामसिंग राणे यांनी व्यक्त केला आहे.
रेडी प्रथमिक आरोग्य केंद्रात असलेली रुग्णवाहिका नादुरूस्त असल्याने खनिकर्म मधून रुग्णवाहिका मिळावी अशी वारंवार जिल्हापरीषद सदस्य प्रितेश राऊळ व आपण वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली होती. तसेच याबाबत जिल्हा परीषद अध्यक्ष तसेच आरोग्य सभापती अनिषा दळवी यांच्याकडेही वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप रुग्णवाहिका मिळाली नाही. रेडी गावातून खनिकर्मसाठी सुमारे 8 कोटी रक्कम गेली असताना सुध्दा रुग्णवाहिका रेडी गावलाच मिळत नाहि हे दुर्दैव आहे. यामुळे तात्काळ रेडी प्राथमिक आरोग्य केंद्राला खनिज विकास नॉब प्रमाणे रुग्णवाहिका न मिळल्यास तसेच रेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचा व्हँक्सीनेशन हॉल (मिटींग हॉल) हा तौक्ते वादळांत छप्पराचे पत्रे उडून गेल्याने नुकसान झालेले आहे. या व्हाँलमुळे गैरसोय निर्माण झालेली आहे. या संदर्भात जिल्हा परीषद आरोग्य सभापती अनिषा दळवी यांच्याकडे पाठपुरावाकरूनही त्याचे काम झालेले नाही. त्यामुळें या आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच मिळून आंदोलनाचा पवित्रा घेऊन असा इशारा रेडी सरपंच रामसिंग राणे यांनी जिल्हा तसेच राज्य प्रशासनाला दिला आहे.