प्रतिनिधी / बेळगाव
इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनियर्सच्या बेळगाव शाखेचे नूतन अध्यक्ष म्हणून अभियंता रमेश जंगल यांची निवड करण्यात आली आहे. शाखेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
रमेश जंगल यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यात 40 हून अधिक वर्षे काम केले. नवलगुंद, हल्याळ, बैलहोंगल, बेळगाव अशा विविध ठिकाणी त्यांनी सेवा बजावली. बेळगाव विभागात कार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी काम केले. अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. कर्नाटक विद्यापीठाचे सीनेट सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. कर्नाटक पीडब्ल्यूडी ऍण्ड इरिगेशन इंजिनियर्स असोसिएशनचे को-चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले.
इन्फोसिस फौंडेशनच्या उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग आहे. मोफत वैद्यकीय सेवा, अन्नदान, योगा आदी उपक्रमात ते सक्रिय आहेत. विविध 13 शैक्षणिक संस्थांमध्ये ते पदाधिकारी म्हणून काम पाहतात. विजयश्री, सीरीगन्नडा, अभिमानी कन्नडिगा असे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.









