नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
कोरोना उपाय योजनांवरुन केंद्र सरकारवर देश विदेशातून आरोप प्रत्यारोप झाले आहेत. भाजप नेत्यांनी अशा टीकेचे वारंवार खंडन केले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.
पंतप्रधान मोंदी यांनी देशातील कोरोना यूद्ध जिंकण्याची घोषणा करत असतानाच देशातील ऑक्सीजन बेड संख्या 36%, आईसीयू बेड संख्या 46% आणि वेंटिलेटर बेडची संख्या 28 % नी घटवली. मोदींच्या या निर्णयामुळे कधी न भरून येणारे नुकसान झाले आहे, याला जबाबदार कोण ? असा सवाल प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला आहे.
डीसेंबर 2020 मध्ये 247972 इतके ऑक्सीजन बेड होते. तीच संख्या 28 जानेवारी 2021 मध्ये 36% घट होऊन 157344 झाली आहे. याच दरम्यान आईसीयू बेड 66638 वरुन 46 % कमी होत 36008 झाली आहे. तसेच व्हेंटिलेटर बेडची संख्या 33024 इतकी होती ती सद्या 28 % कमी होत 23618 झाली आहे. याबरोब मोदींच्या कोरोना अपयशाचा पाढा वाचत कोरोना लढ्यासाठी एक वर्षे अवधी मिळाला असतानाही मोदी सरकार कोरोना यूद्घ जिंकल्याच्या खोट्या भाषणबाजीत व्यस्त होते. 2014 पासून अद्याप मोदी सरकार एक ही नवी एम्स (AIIMS) सुरू करु शकलेले नाही. मात्र सेंट्रल व्हीस्टा बांधकाम प्रकल्पास अत्यावश्यक सेवेचा दर्जा देत सुरु ठेवले आहे. म्हणजे पंतप्रधान मोदींना करोडो भारतीयांच्या जीवापेक्षा नवी होणारी संसंद महत्त्वाची असल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या या कारभारामुळे देशातील कित्येक नागरिकांनी रुग्णालयाच्या दारातच आपला जीव सोडला आहे. 2014 साली सत्तेत आल्यानंतर मोदींनी आरोग्य विषयक बजेट तरतूदींमध्ये 20 % घट केली आहे. याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी दोन हात करताना नेमके काय काय निर्णय केले त्याचा देशावर कसा परिणाम झाला याचा जणू संपूर्ण पाढाच प्रियांका गांधी यांनी वाचला आहे.








