प्रतिनिधी / शाहुवाडी
मलकापूर मंगळवारपेठ येथील युवक बेपत्ता होता. त्याचा मृतदेह शाळी नदीपात्रातील जॅकवेल शेजारील पाण्यात तरंगताना आज शाहूवाडी पोलिसांना आढळून आला. रजत रंजन धामणस्कर वय २६ असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, रजत हा गुरूवार दि.३ जून रोजी घरातून बेपत्ता झाल्याची वर्दी त्यांच्या वडिलांनी दिली होती. त्यानुसार शोध घेतला असता आज दुपारी २.३० च्या दरम्यान त्यांचा मृतदेह शाळी नदीतील जॅकवेल शेजारी पाण्यात तरंगताना आढळून आला. त्यांचा मृतदेह शाहूवाडी पोलिस व स्थानिक नागरिकांना नदी पात्रातून बाहेर काढला. रजत पिग्मी एजंट म्हणून काम करत होता. सर्वांशी त्याचे खेळीमेळीचे संबंध होते.
अनेकांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले
रजत धामणस्कर या युवकाने मलकापूर पंचक्रोशीतील अनेकांशी मैत्रीचे आणि जिव्हाळ्याचे नाते जोडले होते. त्याच्या या जाण्याने
मित्रपरिवारास अनेकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या होत्या शांत संयमी आणि कामाशी प्रामाणिक असलेला युवक म्हणून रजत धामणस्कर याची सर्वत्र ओळख होती. कमवता एकुलता एक मुलगा गेल्याने आई-वडिलांचा आधार हरपला आहे. अधिक तपास पोना एस व्ही काशिद करिता आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









