ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात एकीकडे कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. असे असले तरी दुसरीकडे पोस्ट कोविड रुग्णांमध्ये आढळणाऱ्या ‘ब्लॅक फंगस’ या आजाराने राज्यात अक्षरशः थैमान घालण्यास सुरूवात केली आहे.
ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आतापर्यंत ‘ब्लॅक फंगस’ चे 5 हजार 763 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 476 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात माहिती दिली