प्रतिनिधी / बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने कोरोना रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले. या कोविड केअर सेंटरमध्ये अनेक रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. सेंटरसाठी अनेक जण मदत करताना दिसत
आहेत. गुरुवारी एन्जल फौंडेशनच्यावतीने आर्थिक मदत करण्यात आली.
म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके आणि मदन बामणे यांच्याकडे ही मदत देण्यात आली.
एन्जल फौंडेशनच्यावतीने आतापर्यंत विविध भागांमध्ये 800 किटचे वाटप करण्यात आले. पोलीस तसेच इतर सर्वसामान्य गरजूंना सकाळ-संध्याकाळ नाष्टा तसेच जेवणही पुरविण्यात येत आहे. शहरातील विविध भागांमध्ये या फौंडेशनच्या माध्यमातून मदत करण्यात येत आहे.
यावेळी मीना बेनके, मिलन पवार, एन्जीलिना डिसोजा, लार्सन डिसोजा, सुमिता होसमनी, एंजुमन शेख, अक्काताई सुतार यांच्यासह इतर कार्यकर्त्या उपस्थित
होत्या.









