बँका, सहकारी बँका व पतसंस्था केवळ कृषी व अत्यावश्यक सेवांसाठी दुपारपर्यंत सुरु राहणार
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी आज गुरुवार 3 जुनपासून सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात आरोग्य विषयक सुविधा, मेडिकल, कृषी विषयक दुकाने आणि बँक सुविधा सुरू राहणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी 1 जून रोजी सुधारित आदेश काढले आहेत.
औषध व्यापार रोख प्रवाह पूर्णपणे बँकिंग कारवायांवर अवलंबून आहे. रोख रक्कम न ठेवल्यास धनादेशांची उछाल होण्याची आणि फार्मा कंपन्यांकडून औषधांचा पुरवठा थांबविण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यासाठी औषध विक्रेते यांनी केलेल्या विनंती केली कि, बँकांना रोख / धनादेश जमा करण्याची विनंती करा. त्यामुळे प्रशासनाने काढलेल्या आदेशात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत.
सहकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) व खाजगी बँका, सहकारी बँका, पतसंस्था यांचेशी संबंधित फक्त शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अनुषंगाने पिक कर्जाचे खत, बि-बियाणे, शेती अवजारे यांची दुकाने, गॅस एजन्सीज, पेट्रोलपंप, मेडीकल यांचे रोख व्यवहार इ. कामकाज एटीएम मध्ये पैसे भरणे, चेक क्लिअरन्स. डाटा सेंटर, ही कामे कार्यालयीन कामकाजा दिवशी सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 या कालावधीत चालू राहतील. तसेच बँकांचे उर्वरीत सर्व कामकाज पुर्णपणे बंद राहील. त्या ठिकाणी गर्दी होणार नाही तसेच कोरोनाचे अनुषंगाने सोशल डिस्टन्सींगचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची जबाबदारी संबंधित बँक व्यवस्थापक यांची राहील असे आदेश देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









