वृत्तसंस्था/ माद्रिद
कार्लो ऍन्सेलोटी यांचे रियल माद्रिदमध्ये पुनरागमन झाले असून प्रशिक्षक या नात्याने त्यांनी दुसऱयांदा जबाबदारी स्वीकारली आहे. याआधी ते एव्हर्टन संघाचे प्रशिक्षक होते. तशी घोषणा दोन्ही संघांनी केली आहे.
इटलीच्या ऍन्सेलोटी यांनी याआधी 2013 ते 2015 या कालावधीत रियल माद्रिदचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. झिनेदिन झिदान यांनी अलीकडेच प्रशिक्षकपद सोडल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. रियल माद्रिदने त्यांच्याशी तीन वर्षांचा करार केला आहे. येथे दाखल होण्याआधी ते डिसेंबर 2019 पासून एव्हर्टनमध्ये प्रशिक्षकाचे काम पाहत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या मोसमात एव्हर्टनला प्रिमियर लीगमध्ये दहावे स्थान मिळाले होते. 2014 मध्ये रियल माद्रिदचे ते प्रशिक्षक असताना संघाने चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळविले होते. रियलचे ते दहावे युरोपियन जेतेपद ठरले होते. मात्र एक वर्षानंतर त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.









