ओटवणे / प्रतिनिधी-
ओटवणे मांडवफातरवाडी येथील रहिवाशी रामचंद्र महादेव परब (७५) यांचे मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील उमेश परब यांचे ते वडील तर महेश परब यांचे ते काका होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, एक भाउ, सुन, पुतण्या, जावई, नातवंडे असा परीवार आहे.









