अनेक संघ-संस्थांसह दानशुरांकडून वस्तू स्वरुपात-अन्नधान्याच्याही मदतीचा ओघ : आठ रुग्ण बरे होऊन परतले
वार्ताहर / खानापूर
खानापुरातील श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समितीच्या वतीने आयोजित महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला अनेकांनी आर्थिक तसेच वस्तू स्वरूपातील व अन्नधान्य स्वरूपात अनेकांनी मदतीचा ओघ सुरूच ठेवला आहे.
मंगळवारी खानापूर समृद्धी मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने सोसायटीचे संस्थापक संजय कुबल, अध्यक्ष पिराजी कुराडे तसेच संचालक मंडळाच्या उपस्थितीत केअर सेंटरमधील रुग्णांसाठी पाच हजार रुपयांचा धनादेश समितीचे अध्यक्ष किरण येळ्ळूरकर, सेपेटरी सदानंद पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी सोसायटीचे संचालक यशवंत गावडे, संचालक राजू जांबोटकर, हरी गोरल, शाहू अगनोजी, सेपेटरी ज्योतिबा अलोळकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सोसायटीचे चेअरमन पिराजी कुऱहाडे यांनी महालक्ष्मी कोविड केअर सेंटर उभारून खानापूर तालुक्मयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी एक आशेचा किरण निर्माण केला आहे. गेल्या आठवडाभरापासून या कोविंड सेंटरमध्ये वीसहून अधिक रुग्ण दाखल झाले. त्यापैकी आतापर्यंत आठ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दहाहून अधिक रुग्ण उपचारात आहेत. या रुग्णांच्या सेवेसाठी अनेक संघ संस्थांनी मदतीचे हात उभे केले आहेत. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्रीराम सेना हिंदुस्तानचे कार्यकर्ते रुग्णांच्या सेवेसाठी कार्यतत्पर आहेत. त्यांचे समाजसेवी कार्यकर्ते, डॉक्टर्स व संयोजकांनी कौतुक केले.
यावेळी महालक्ष्मी ग्रुपचे सेपेटरी तुकाराम हुंदरे, विश्व हिंदू परिषदेचे सिद्धार्थ कपिलेश्वरी यासह अनेक जण उपस्थित होते.
श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरचे अध्यक्ष किरण येळूरकर यांनीही स्वतः या सेंटरची जबाबदारी खांद्यावर घेत आपलाही खारीचा वाटा राहावा म्हणून त्यांनी स्वतः 5001 रुपयांची देणगी दिली
आहे.
सदानंद पाटील यांच्याकडून 10000 देणगी
खानापूर येथील सदानंद लक्ष्मणराव पाटील गर्लगुंजी यांचेकडून रोख 10000 रुपये तसेच 2 ऑक्सिमीटर या सेंटरला मदत दिली. तसेच खानापूरचे पोलीस निरीक्षक सुरेश सिंगी यांनी सेंटरमध्ये येणाऱया रुग्णांसाठी दररोज अंडी पुरवठा करणार आहेत.
खानापूर तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने मंगळवारी दुपारी सेंटरमध्ये काम करणाऱया कर्मचारी तसेच स्वयंसेवक कार्यकर्त्यांसाठी दुपारच्या भोजनाची तसेच मास्क व सॅनिटायझर देऊन मदत केली. यावेळी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा युवा मोर्चा तसेच तालुका युवा मोर्चा अध्यक्ष व युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच खानापूर येथील श्रावण शेट्टी यांनी 10 पाण्याचे बॉक्स देऊन मदत केली..