प्रतिनिधी / कोल्हापूर
सुप्रसिद्ध मराठी लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या व शिवाजी विद्यापीठ प्रौढशिक्षण विभागाच्या माजी संचालक प्रा.अनुराधा गुरव यांचा प्रथम स्मृतिदिन रविवार दि.30 मे रोजी आहे. या निमित्ताने `प्रा.अनुराधा गुरव : ऑनलाईन आठवणींचा अंतरंग आविष्कार’ या ह्रद्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम रविवार दि 30 मे रोजी सायंकाळी 5 वाजता ऑनलाईन होणार आहे.
यामध्ये प्रा. गुरव यांचे वाचक, विद्यार्थी, साहित्यिक, प्रकाशक, नातेवाईक, साहित्य व इतर संस्था प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी आणि साहित्यप्रेमी हे सहभागी होतील. तसेच त्यांच्या साहित्यावर झालेल्या अनेक संशोधन प्रबंधांपैकी एका संशोधन प्रबंधाचे ई पुस्तक रूपात प्रकाशन होणार आहे.
कोल्हापूर परिसर, महाराष्ट्र व देशभरातील ज्या संबंधितांना यात सहभागी व्हायचे, बोलायचे आहे त्यांनी आपल्या सहभागासाठी संयोजक प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण यांना 9422423660 व समन्वयक डॉ. आशिष गुरव यांना 7030660600 या नंबर वर संपर्क साधावा. त्या सर्वांना रविवारी सकाळी लिंक पाठविली जाईल.