प्रतिनिधी / सांगली
सध्या सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढत असताना समडोळी येथील स्वाभिमानी कोविड सेंटर मधून ९० वर्षांच्या आजीसह २० रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. यासाठी न्यू रणझुंझार युवक मंडळाचे सदस्य व गावातील तरूण अहोरात्र परिश्रम घेत आहेत. कोरोनामुळे सर्वत्र भितीचे वातावरण असताना गावामध्ये कोव्हीड सेंटर व ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू केलेले रूग्ण विलगीकरण कक्ष असल्याने भितीचे प्रमाण कमी झाले आहे. रूग्णांना मानसिक आधार मिळत आहे. तसेच रूग्णांना मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जात असल्याचे ग्रामपंचायत सदस्य संजय बेले यांनी सांगितले.
भूपाळी ते भैरवी कार्यक्रमातील संपत कदम, कृष्णात पाटोळे व कलावंतांनी रूग्णांच्या मनोरंजनासाठी सादर केलेल्या कार्यक्रमामुळे रूग्णांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तसेच सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार दिपक चव्हाण यांच्या कलाकार ग्रुपने मराठी व हिंदी चित्रपटातील गाण्याच्या माध्यमातून रूग्णांचे मनोरंजन केले.
कोविड सेंटर मध्ये युवा नेते संजय बेले, व्यवस्थापक दिपक मगदूम, अध्यक्ष विद्याधर बेले, उपाध्यक्ष सागर पाटील, खजिनदार सुरेश पाटील, हर्षद खोत, सम्मेद बेले, भरत पाटील, दिपक चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते रूग्णांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.