बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात भाजप नेतृव बदलाबाबत पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत. याआधी बऱ्याच वेळा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बसणगौडा पाटील यत्नाल यांनी राज्यातील भाजप नेतृत्व बदलण्याची मागणी केली होती. पण आतापर्यंत पक्षाने राज्य नेतृत्वात कोणताही बदल केला नाही. दरम्यान पुन्हा एकदा राज्यात नेतृत्व बदल होणार असल्याच्या चर्चेनंतर गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
बेंगळूरमध्ये टाऊन हॉल येथे बुधवारी पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले, राज्यात नेतृत्वबदलाचे वृत्त अधिकृत नाही. जी काही चर्चा सुरु आहे ती केवळ अफवा आहे. त्यामुळे या प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. मुख्यमंत्रीपदासाठी जे इच्छुक आहेत त्यांनाच याबाबत प्रश्न विचारा असे सांगितले.