- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 % पेक्षा अधिक
ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशातून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. प्रदेशातील रुग्ण वाढीच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. प्रदेशात नव्या रुग्णांचा आकडा तर आता 3,500 पेक्षा कमी आला आहे. मंगळवारी कोरोनाचे 3,371 नवे रुग्ण आढळून आले. या दरम्यान, कोरोना संसर्गाचा दर 1 टक्क्यांपेक्षा कमी म्हणजेच 0.94 % इतका झाला आहे, अशी माहिती प्रदेशाचे सूचना निर्देशक शिरीष यांनी आज ट्विट करत दिली.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मागील 24 तासात प्रदेशात 3,58,273 नमुने तपासण्यात आले त्यातील 3,371 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर 10,540 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामूळे प्रदेशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 % पेक्षा अधिक झाले आहे. पुढे ते म्हणाले, सद्य स्थितीत प्रदेशात 62,271 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 15 लाख 88 हजार 161 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शिरीष यांनी आणखी एक ट्विट करून लसीकरणाबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, प्रदेशातील 45 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 1,68,16,336 नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर 18 ते 45 वयोगटातील 13,61,555 जणांना लस देण्यात आली आहे.