बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी ब्लॅक फंगसवर सरकारचे कोणतेही स्पष्टीकरण नाही. राज्यातील मंत्री लोकांमध्ये भीती निर्माण करणारी विधाने करत आहेत. दरम्यान, शिवकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना, राज्यात ब्लॅक फंगसचा संसर्ग होत असूनही राज्य सरकार यावर कोणतही स्पष्टीकरण देण्यास तयार नाही, असे ते म्हणाले. तसेच सरकारने ब्लॅक फंगसवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात असेही म्हंटले आहे.
कर्नाटक काँग्रेसने कोविड लसींसाठी १०० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव दिला होता. यासंदर्भात काँग्रेसने केंद्र आणि राज्य सरकारने याबाबत प्रस्ताव दिला होता. त्यामुळे राज्य सरकारने या कराराचा विचार केल्यास पक्ष त्यासाठी योग्य ती उपाययोजना करेल, असे ते म्हणाले. शिवकुमार आज चिक्कमंगळूर येथे आले असता त्यांनी कोरोना, लस, ब्लॅक फंगस संसर्ग आणि अन्य मुद्यांवर त्यांनी भाष्य केले.
यावेळी शिवकुमार यांनी शांतीवन नेचर हॉस्पिटलला भेट दिली. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत शेट्टी यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर ते बेंगळूरला रवाना होतील.