प्रतिनिधी / पन्हाळा
कोल्हापुर-रत्नागिरी महामार्गावरील वाघबीळ घाटात वाळुने भरलेला ट्रकच्या टायर अचानक फुटल्याने ट्रक एका बाजुला पटली झाली. त्यामुळे या ट्रकचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेचे नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.
घटना स्थळवरुन मिळालेली अधिक माहिती अशी, सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास वाळुने भरलेला एम.एच.09 इ.एम 9677 क्रमांक असलेला सदरचा ट्रक कोकणातुन कोल्हापुरकडे जात होते. वाघबीळ घाटातील नलवडे बंगल्याच्या नजीकच्या तीव्र वळणावर अचानक ट्रकच्या पाठीमागील डाव्या बाजुच्या दोन्ही टायर फुटले. त्यामुळे चालकाला काही कळण्याच्या आत ट्रक डाव्या बाजुस पलटी झाला. या घटनेमुळे ट्रकच्या पुढील भागाचा काचा फुटलेल्या असुन आतील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर ट्रकच्या पाठीमागच्या भागाचा चक्काचुर झालेले आहे.
सुदैवाने यामध्ये चालक व त्यांचा जोडीदार यांचा जीव वाचला असुन त्यांना थोडीफार दुखापत झाली आहे.त्यामुळे ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’याची प्रचिती या अपघातामुळे आली आहे. या अपघातामुळे ट्रकमधील वाळु रस्त्यावर पसरली होती. रस्त्याच्या मधोमध ट्रक पलटी झाल्याने वाहतुकीला थोडीफार अडचण निर्माण झाली होती. कोरोना महामारीमुळे रस्त्यावर रहदारी कमी असल्याने देखील या अपघातामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा देखील घटनास्थळवर सुरु होती. करवीर पोलिसांकडुन सदरच्या घटनेचा पंचनामा करण्यात आला असुन याची नोंद करण्यात आली आहे.