ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात आतापर्यंत 16 कोटी 80 लाख 17 हजार 392 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 34 लाख 88 हजार 273 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 14 कोटी 93 लाख 61 हजार 406 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 1 कोटी 50 लाख 75 हजार 087 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 97 हजार 435 केसेस गंभीर आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
कोरोना रुग्णवाढीची आणि मृतांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 3 कोटी 39 लाख 22 हजार 937 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 6 लाख 04 हजार 416 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर भारताचा यात दुसरा क्रमांक लागतो. भारतात 2 कोटी 69 लाख 48 हजार 874 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 3 लाख 07 हजार 249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.