प्रतिनिधी/आटपाडी
३१ मे रोजी देशातील बहुजनांच्या प्रेरणास्त्रोत माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून धनगर आरक्षणाचा निर्धार पक्का करायचा आहे. धनगर आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारला हादरा द्यायचा आहे. त्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर आरक्षणाचा जागर करूया, असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
यंदा कोविडमुळे अहिल्यादेवी यांची जयंती मोठ्या स्वरूपात साजरी करता येणार नाही. परंतु आपल्या घरातूनच सर्वांनी आपल्या धनगरी पोशाखात अहिल्यामातेला वंदन करून जयंती उत्सव साजरा करायचा आहे. यावेळी चौंडी येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना वंदन करुन आमदार पडळकर सोशल मीडियावरुन समाजबांधवाशी संवाद साधणार आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








