जिल्हय़ात 555 नवे रुग्ण, 17 जण दगावले : कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
सोमवारी 555 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होवून वेगवेगळय़ा कोविड सेंटर व इस्पितळांतून घरी परतलेल्यांची संख्या अधिक आहे. कोरोनामुक्त झालेल्या 738 जणांना घरी पाठविण्यात आले आहे तर गेल्या 24 तासात 17 जण दगावले आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 57846 इतकी झाली आहे. त्यापैकी 39946 जणांनी कोरोनावर मात केली असून अद्याप 17 हजार 441 सक्रिय रुग्ण आहेत. जिल्हय़ातील मृतांचा आकडा 459 वर पोहोचला आहे. अद्याप 1 हजार 591 जणांचे अहवाल यायचे आहे.
गेल्या 24 तासांत बेळगाव तालुक्मयातील 4, बैलहोंगल, रायबाग, गोकाक, अथणी, खानापूर तालुक्मयातील प्रत्येकी दोन व हुक्केरी तालुक्मयातील तिघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी एका सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 11 जण दगावले आहेत. यावरुन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काय परिस्थिती आहे हे लक्षात येते.
अद्याप जिह्यातील 19 हजार 428 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. आतापर्यंत 7 लाख 55 हजार 323 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 91 हजार 873 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बिम्स्मधील व्यवस्था सुरळीत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. उपचारासाठी बिम्स्च्या दारात जाणाऱयांना परत पाठविले जात आहे.
सोमवारी सांबरा एटीएसमधील 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. होनगा, मुचंडी, के. के. कोप्प, बस्तवाड, काकती, भुतरामहट्टी, बंबरगा, गणेशपूर, कडोली, बिरनट्टी, कंग्राळी बी.के., कुदेमानी, सांबरा, मुत्नाळ, मुतगा, पिरनवाडी, राकसकोप, सुळगा, पंतबाळेकुंद्री, राणी चन्नम्मानगर, टिळकवाडी, तानाजी गल्ली, वडगाव, वंटमुरी कॉलनी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
बसवणकुडची, अंजनेयनगर, अजमनगर, अयोध्यानगर, भाग्यनगर, बिम्स कॅम्पस्, गांधीनगर, अनगोळ, गुडस्शेड रोड, हिंदवाडी, ज्योतीनगर, मजगाव, कणबर्गी, गुरूप्रसाद कॉलनी, खंजर गल्ली, महांतेशनगर, मंडोळी रोड, न्युवैभवनगर, सदाशिवनगर, पोलीस क्वॉर्टर्स, शहापूर, शाहूनगर, कणबर्गी, शास्त्राrनगर, शिवबसवनगर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. अग्निशामक दलातील सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.









