वृत्तसंस्था/ पॅरमा
इटलीतील शनिवारी डब्ल्यूटीए टूरवरील झालेल्या पॅरमा खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या कोको गॉफने एकेरीचे जेतेपद मिळविताना चीनच्या क्युयांगचा पराभव केला.
अमेरिकेच्या गॉफने चीनच्या वेंग क्युयांगचा अंतिम सामन्यात 6-1, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद मिळविले. डब्ल्यूटीए टूरवरील गॉफचे हे दुसरे विजेतेपद आहे. 2019 साली गॉफने लिंझ हार्डकोर्ट टेनिस स्पर्धा जिंकली होती. गॉफला या विजयासाठी 74 मिनिटे झगडावे लागले. या स्पर्धेत 17 वर्षीय गॉफने अंतिम फेरीत मजल मारताना केवळ एक सेट गामविला.









