नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के. एस. होसाळीकर यांनीही ट्विट करुन मान्सून अंदमानात दाखल झाल्याची माहिती दिली आहे.
हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के. एस. होसाळीकर यांनीही ट्विट करत म्हटले आहे की, मोसमी पाऊस आज अंदमानात पोहोचला.
नैऋत्य मोसमी वारे पुढील तीन दिवसात म्हणजेच 21 मेपर्यंत अंदमान बेटावर दाखल होईल असं हवामान विभागाने सांगितलं होतं. त्यानुसार मान्सूनने अंदमान दाखल झाला आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांना भारतीय उपखंडात मान्सून म्हटलं जातं. भारतीय हवामान विभागानं हे वारे 1 जूनला केरळमधील दाखल होतील, असा अंदाज वर्तवला आहे. सध्या हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 21 मे रोजी नैऋत्य मोसमी वारे हे अंदमान बेटांवर पोहोचतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.