सांगली / विशेष प्रतिनिधी
तौक्ते वादळाचा फटका बसून विस्कळीत झालेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज पुरवठा युद्ध पातळीवर पूर्ववत करण्यासाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून ४९२ वीज कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले असून त्यांनी कामास सुरुवात केली आहे. पुढचे आठ दिवस हे पथक तळ कोकणात कार्यरत असेल. कोल्हापूर परिमंडळ चे कार्यकारी अभियंता अंकुर कावळे यांनी ही माहिती दिली.
तौक्ते वादळाने विजेच्या तारांचे आणि खांबांचे मोठे नुकसान झाले आहे. एका दांमप्त्याचा मृत्यूही झाला आहे. वादळानंतर जनजीवन पूर्ववत करण्याचे मोठे आव्हान यंत्रणे समोर आहे. त्यात ठिकठिकाणच्या वीज पुरवठ्याच्या बाबतीत मोठा अडथळा असल्याने जिल्ह्याच्या बाहेरूनही अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २९३ कर्मचारी व सांगली जिल्ह्यातील १९९ कर्मचारी असे कोल्हापूर सांगली महावितरण विभागातून ४९२ कर्मचारी पाठवले असल्याची माहिती अंकुर कावळे यांनी दिली.
कोकण किनारपट्टीशी समांतर गेलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे किनारी भागातच वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागांमधला वीजपुरवठा, विस्कळीत झाला. हजारो खांब उन्मळून पडले आहेत.त्याचा फटकाही मोठा आहे. नुकसानग्रस्त भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीने १३ हजार तंत्रज्ञांचे मनुष्यबळ मैदानात उतरवले आहे. तसेच विभाग स्तरावर ४६ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.कोरोना काळात कर्मचारी, वाहन व्यवस्था आदी आव्हानांवर मात करून २४ तासाच्या आत यंत्रणा पोहोचून ठिकठिकाणी कामाला प्रारंभ झाल्याने नुकसानग्रस्त जनतेला किमान दिलासा मिळाला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









