बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात मंगळवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली तर राज्याला दिलासा देणारी बाब म्हणजे विविध जिल्ह्यातील ५८ हजाराहून अधिक रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांनी कोरोनाचा पराभव करून एक नवीन विक्रम केला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५८,३९५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले. दरम्यान, एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. त्याचबरोबर मंगळवारी राज्यात ३०,३०९ नवीन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यासह, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या २२,७२,३७४ वर पोहोचली आहे. यापैकी १६,७४,४८७ रुग्ण कोरोनाविरुद्ध लढाई जिंकली आहे. आरोग्य विभागाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार राज्यात ५२५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. राज्यात कोविडमुळे आतापर्यंत एकूण २२,८३८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३.६८ टक्के होते आणि मृत्यूचे प्रमाण एक टक्के होते. तर सकारात्मकतेचा दर ३२.५० टक्के होते.
बेंगळूरमध्ये १० हजारांहून अधिक मृत्यू
बेंगळूर शहरी जिल्ह्यात मंगळवारी ८६७६ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यासह जिल्ह्यात आतापर्यंत एकूण संक्रमित रुग्णांची संख्या १०,७३,०७२ वर पोहोचली आहे. तर यापैकी ७२२,०८६ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
जिल्ह्यात सध्या ३,४०,९६५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात कोविडमुळे एकूण १०,०२० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार २९८ रुग्णांचा मृत्यू मंगळवारी झाला आहे. बेंगळूर शहराचा पुनर्प्राप्ती दर ६७.२९ टक्के आणि मृत्यू दर ०.९३ टक्के आहे.









