अमेझॉन प्राइम व्हिडिओने ‘शेरनी’ हा चित्रपट पुढील महिन्यात स्वतःच्या स्ट्रीमिंग सेवेवर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा मंगळवारी केली आहे. अमित मसूरकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या आणि एबंडेंटिया एंटरटेनमेंटकडून निर्मित या चित्रपटात विद्या बालन मुख्य भूमिकेत आहे. याचबरोबर शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राज, इला अरुण, ब्रजेंद्र काला आणि नीरज काबी यासारखे कलाकार यात दिसून येतील. चित्रपटात विद्या बालनने एका महिला वन अधिकाऱयाची भूमिका साकारली आहे.
‘शंकुतला देवी’च्या यशानंतर आम्ही भारतासह जगभरातील स्वतःच्या ग्राहकांसाठी विद्या बालनच्या अभिनयाने नटलेला आणखी एक चित्रपट ‘शेरनी’ घेऊन येत आहोत. घरबसल्या ऍडव्हेंचरचा अनोखा अनुभव या चित्रपट लोकांना मिळवून देणार असल्याचे अमेझॉन प्राइम व्हिडिओने म्हटले आहे.









