प्रतिनिधी / गारगोटी
काल रात्री दि. १७ मे रोजी झालेल्या वादळी पावसामुळे वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होवून नदीकाठावरील शेकडो विद्युत मोटारी पाण्यात बुडल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांना बरगे घातल्याने गंभीर परिस्थीती ओढावल्याची माहिती शेतकऱ्यानी दिली.
भुदरगड तालुक्यासह कडगाव पाटगाव परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.रात्रभर पावसाचा जोर होता. अतिवृष्टीमुळे पाणी संपूर्ण शेत शिवारात झाले, ओढे नाले भरून वाहू लागल्याने नदीच्या पाण्यात कमालीची वाढ झाली. रात्री बारानंतर पावसाने जोर धरल्याने म्हसवे, निळपण, वाघापूर बंधाऱ्याला बरगे घालण्यात आले होते. पाणी पातळी वाढून नदी दुथडी वाहू वाहू लागली. नदीकाठावरील शेकडो मोटारी पाण्यात बुडून शेतकऱ्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.
पावसामुळे भुईमूग काढणीसह शेतीच्या मशागत कामे खोळंबली आहेत. पाटबंधारे विभागाने वादळाचा इशारा मिळूनही बरगे बंधाऱ्याना ठेवल्याने नुकसानीची जबाबदारी घेवून शेतकऱ्यांना नुकसान