बेंगळूर/प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कर्नाटकातील कोविड १९ रुग्णांची संख्या ज्या जिल्ह्यात जास्त आहे, त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि इतर मंत्रीही उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत उत्तर कन्नड, हसन, बल्लारी, म्हैसूर, तुमकूर, कोलार, कोडगू, उडुपी, बेंगळूर शहरी व ग्रामीण, शिवमोगा, धारवाड, दक्षिण कन्नड, रायचूर, मंड्या, गुलबर्गा आणि चिकबळ्ळापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सहभागी होते.