ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना संक्रमणाचा वेग काहीसा मंदावला आहे. मात्र, दैनंदिन मृतांचा वाढता आकडा आता चिंतेचा विषय बनला आहे. सोमवारी देशभरात 2 लाख 63 हजार 533 नवे संक्रमित रुग्ण आढळले. तर 4329 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाबळींचा एका दिवसातील आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. दिलासादायक बाब म्हणजे मागील 24 तासात 4 लाख 22 हजार 436 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
देशात 2.52 कोटी लोक कोरोनाच्या विळख्यात
देशात आतापर्यंत 2 कोटी 52 लाख 28 हजार 996 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 15 लाख 96 हजार 512 लोक पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 33 लाख 53 हजार 765 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 2 लाख 78 हजार 719 रुग्णांचा बळी घेतला आहे.
आतापर्यंत देशातील 18.44 कोटी नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.









