विनाकारण फिरणाऱयांना पुन्हा दणका
प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणाऱयांवर कारवाईचा इशारा दिला होता. वाहने जप्त तसेच दंडात्मक कारवाई केली जाणार, असे सांगूनही अनेक जण घराबाहेर विनाकारण फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांनी अशा वाहनचालकांवर कारवाई केली आहे. सोमवारी 35 वाहने जप्त करून विनामास्क फिरणाऱया 220 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गसूचीचे पालन करावे, असे वारंवार आवाहन करून पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद केले आहेत. विनाहेल्मेट व विनामास्क फिरणाऱयांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱया 35 जणांची वाहने जप्त केली आहेत. यामुळे वाहनचालकांना चांगलाच दणका बसला आहे.
अनेक वेळा आवाहन करूनही विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई केली आहे. 220 जणांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक वाहने जप्त केली आहेत.









