ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
बँकांचे आधुनिकीकरण करण्यासाठी देशातील बँकांची बँक सातत्याने प्रयत्नशील असते. यासाठी वारंवार ऑनलाईन कींवा डिजीटल व्यवहार यावर भर दिला जातो. हेच व्यवहार अधिक गतीमान करण्यासाठी भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडियाने एक ट्वीट जारी करत यामध्ये एक सुचना केली आहे. 23 मे रोजी 14 तासांसाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (एनईएफटी ) सेवा बंद असणार आहे. ही माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. ज्याचा उद्देश डिजिटल व्यवहारांना अधिक गती देत प्रोत्साहन देणे हा आहे.
काय आहे एनईएफटी { NEFT }
भारतीय रिझर्व बँकेने नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर ही सेवा प्रणाली 2005 साली सुरु केली गेली. जी ईलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या साहाय्याने पैसे हस्तांतरणासाठी वापरली जाते. या आधारे एखादी व्यक्ती, संस्था देशातील कोणत्या ही ठीकाणाहून अन्य ठीकाणच्या बँक शाखेत सुलभरित्या पैसे हस्तांतरीत करु शकते. ही प्रणाली प्रत्येक दिवशी 24 तास सुरु असते. ही प्रणाली चेक आणि डिमांड ड्राफ्ट च्यामाध्यमातून पैसे हस्तांतरण करण्यासाठी सशुल्क सेवा पुरवत असते.