प्रतिनिधी/ निपाणी
निपाणी शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. याबरोबरच बाधितांचा मृत्यूचा आकडा वाढतच चालला आहे. निपाणी शहरासह तालुक्मयात कोरोना मृतांचा आकडा 76 वर पोहचला आहे. शुक्रवारी व शनिवारी सायंकाळपर्यंत 9 जणांचा कोरोनाने बळी घेतला. यामध्ये निपाणी शहरातील तिघांचा तर निपाणी ग्रामीण भागातील 4 जणांचा समावेश आहे. तसेच निपाणीत उपचार घेत असलेले पण सदर दोन्ही मृत रुग्ण हे चिकोडी आणि हुक्केरी तालुक्मयातील आहेत.
निपाणी शहरातील हणबर गल्लीतील 50 वषीय व्यक्ती, साईशंकर नगर येथील 42 वर्षीय युवा उद्योजक आणि प्रभात टाकी परिसरातील मूर्तीकार यांचे कोरोनाने उपचारादरम्यान निधन झाले. याबरोबरच निपाणी तालुक्मयातील शिरगुप्पी येथे कोरोना बळीचे सत्र सुरूच आहे.
येथील 65 वषीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आडी येथील अवघ्या 32 वषीय युवकाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तसेच जत्राट येथील 65 वषीय वृद्ध आणि गळतगा येथील 73 वषीय वृद्धाचाही कोरोनाने बळी घेतला. याबरोबर चिकोडी तालुक्मयातील काडापूर येथील महिलेचा आणि हुक्केरी तालुक्मयातील हिडकल डॅम येथील 40 वषीय पुरुषाचा निपाणी येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील सातपैकी पाच जण निपाणी तालुक्मयातील तर दोघे चिकोडी आणि हुक्केरी तालुक्मयातील आहेत.
कोरोनाबाधित मृतांवर येथील एकता फाऊंडेशन आणि राष्ट्रकर्म संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंत्यसंस्कार केले. शहरातही कोरोनाबाधितांचा आकडा 200 च्या घरात पोहचला आहे. याची दखल घेत निपाणी शहरात पालिकेच्या वतीने तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या वतीने सॅनिटायझरची फवारणी करण्यात येत आहे. असे असले तरी फक्त सॅनिटायझर फवारणी न करता नियमांच्या कडक अंमलबजावणीसह आरोग्य यंत्रणा सुधारताना योग्य उपचाराची सोय उपलब्ध होण्याची गरज सुज्ञ नागरिकांतून व्यक्त होत आहे.
शनिवारी 7 जणांचा मृत्यू
बेळगाव ः कोरोनामुळे जिल्हय़ातील आणखी सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता हा आकडा 389 वर पोहोचला असून पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे. सध्या जिल्हय़ामध्ये 10 हजार 464 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार करण्यात येत आहेत. शनिवारी 614 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. तर शनिवारी नव्याने 977 रुग्ण आढळले आहेत. दररोज रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाणही वाढल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.









