प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना प्रतिबंधक लस मिळत नाही म्हणून सर्वसामान्य जनतेतून तक्रारी वाढल्या आहेत. पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींना दुसरा डोस देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. असे असले तरी प्रत्येकजण इंजेक्शन घेण्यासाठी धडपडत आहेत. मात्र तासन्तास रांगेत उभे राहूनही अनेकांना लस मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
या कोरोना लसीचा लेखाजोखाही आता जाहीर करण्यात येत असून आरोग्य विभागातर्फे मंगळवार दि. 11 पर्यंत उपलब्ध असलेला लसींचा साठा जाहीर केला आहे. जिल्हय़ामध्ये कोव्हॅक्सिनच्या एकूण 2 हजार 60 बॉटल्स उपलब्ध आहेत तर कोव्हिशिल्डच्या 14 हजार 830 बॉटल्स उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.
| तालुका | कोव्हॅक्सिन (10 डोस) | कोव्हिशिल्ड (10 डोस) |
| अथणी | 70 | 930 |
| बैलहोंगल | 180 | 2450 |
| बेळगाव | 200 | 2150 |
| चिकोडी | 20 | 2250 |
| गोकाक | 540 | 2350 |
| हुक्केरी | 140 | 440 |
| खानापूर | 660 | 960 |
| रायबाग | 100 | 1150 |
| रामदुर्ग | 110 | 990 |
| सौंदत्ती | 40 | 1160 |
| एकूण | 2060 | 14830 |









