उद्योगधंदे बंद असल्याने समस्या : भाडे देण्यासाठी भाडेकरूंना करावी लागते कसरत
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचे संकट टळेपर्यंत कोणत्याही घरमालकाला आपल्या भाडेकरुला भाडे देण्यासाठी किंवा घर रिकामे करण्यासाठी तगादा लावता येणार नाही. जर एखाद्या मालकाने आपल्या भाडेकरुला विनाकारण असा तगादा लावला किंवा त्रास दिला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱयांनी मागील लॉकडाऊनच्या काळात दिला होता. आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा भाडेकरुंवर संकट आल्याचे दिसून येत आहे. तेंव्हा काही काळ मुभा द्यावी, अशी मागणी होत आहे.
पुन्हा एकदा भाडेकरुंना क्लोजडाऊन आणि आता लॉकडाऊनचा फटका बसणार आहे. कामावर न जाता आल्यामुळे त्यांचे भाडे थकले जाणार आहे. भाडेतत्त्वावर राहणाऱया क्यक्तीला लॉकडाऊनमध्ये कामावर जाता आले नाही. या व अन्य कारणास्तव त्यांचे अर्थार्जनच थांबले. त्यामुळे घरमालकाला दिले जाणारे भाडेही थकले. परंतु आपण हप्त्याहप्ताने सर्व भाडे चुकता करू, असे सांगण्याची वेळ सध्या आली आहे. त्यासाठी घरमालकांनी काही काळ मुभा देण्याची गरज व्यक्त होत आहे.
भाडेकरुला जिल्हाधिकाऱयांपर्यंत जाऊन तक्रार करणे शक्मय नाही. किंवा पोलीस स्थानकात जाऊन तक्रार करावी इतके धाडस नाही. तक्रार केल्यास घरमालक नाहक आरोप करून अधिकच त्रास देण्याची भिती भाडेकरुंना असते. भाडेकरुंच्या या असहाय्य परिस्थितीचा फायदा काही घरमालकांनी घेतल्याच्या घटना मागीलवेळच्या लॉकडाऊनमध्ये घडल्या. मात्र आता माणुसकीच्या दृष्टिकोनातून घरमालकांना सुट द्यावी, अशी मागणी होत आहे.
घरमालकांकडून मारहाणीच्या घटना
काही सहृदय घरमालकांनी आपल्या भाडेकरुंना अर्धेच पैसे द्या, अथवा जमेल तेंव्हा द्या, असे सांगून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. तर काही ठिकाणी समाजात प्रति÷ित म्हणून मिरवणाऱया घरमालकांनी भाडेकरुला मारहाण करून घराबाहेर काढल्याचे प्रकारही मागीलवषी घडले आहेत. अशा घरमालकांच्या विरोधात कोणतीही तक्रार खपवून घेतली जाणार नाही, असे सांगण्याची गरज व्यक्त होत आहे. बेळगाव जिह्यात पुन्हा एकदा तशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्मयता आहे. कारण 15 दिवस क्लोजडाऊन आणि 15 दिवस पुन्हा लॉकडाऊन त्यामुळे अनेक उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. तर यावर अवलंबून असणाऱया भाडेकरु नागरिकांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मालक आणि भाडेकरु यांच्या समन्वयाने ही समस्या मिटवता येणार आहे.









