जवळपास 8 लाख वर्गफूटापर्यंत क्षमता वाढणार – ग्राहकांच्या सुरक्षेवर भर
मुंबई
वॉलमार्टची कंपनी फ्लिपकार्ट देशातील विविध शहरांमध्ये आपली ग्रॉसरी केंद्रांची क्षमता वाढविण्यावर भर देत आहे. यामध्ये कंपनी जवळपास 8 लाख वर्ग फूटापर्यंत ही क्षमता वाढवली जाणार असल्याची माहिती आहे. यामध्ये दररोज 73 हजार ऑर्डर्स पूर्ण करण्यास मदत मिळणार असल्याचे म्हटले आहे. सदरची क्षमता वाढ ही येत्या तीन महिन्यांपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सदरची ग्रॉसरी क्षमता वाढविण्यासाठी प्रामुख्याने दिल्ली, कोलकाता आणि अन्य शहरांची निवड करण्यात आली आहे. या अतिरिक्त क्षमतेमधून दररोज 73 हजार लोकांच्या ऑर्डर्स पूर्ण केल्या जाणार आहेत. फ्लिपकार्टचा ग्रॉसरी सेक्शन 7 हजारपेक्षा अधिक उत्पादने 200 विविध प्रकारांमध्ये सवलतीसोबत विक्रीसाठी ठेवत असतो. यामध्ये दररोजच्या वापरातील देशी वस्तू, स्नॅक्स, बेव्हरेजेस, कन्फेक्शनरी आणि पर्सनल केअर आदी साहित्यांचा समावेश होणार आहे.
ई-कॉमर्स होतंय सुरक्षित साधन
कोरोनाच्या या संकट काळात ई-कॉमर्स एक सुरक्षित आणि सोपे साधन म्हणून वापरात येत आहे. यातून ई-कॉमर्स क्षेत्र उभारत आहे. ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेत ही डिलिव्हरी केली जात असल्याचेही फ्लिपकार्टने सांगितले आहे.









