बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (बीआयएएल) यांनी बुधवारी, १८ मे रोजी १५० बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड उपचार केंद्र केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आवारात उभारले जाणार असल्याची माहिती दिली.
बीआयएएल अअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या केंद्रात एक फार्मसी, पॅथॉलॉजी युनिट, परिचारिकांचे स्टेशन, प्रसाधनगृह आणि जेवणाचे स्वतंत्र विभाग असेल. पिण्याच्या पाण्याची सोय आणि भेट देणाऱ्यांसाठी योग्य सुविधा असणार आहे, तर आपत्कालीन परिस्थितीची पूर्तता करण्यासाठी एक रुग्णवाहिका २४ तास त्या ठिकाणी ठेवण्याचे नियोजन केले आहे. जैव कचर्यासह इतर कचर्याची सुरक्षित विल्हेवाटही या केंद्राद्वारे केली जाईल.
“डॉ. नरेश शेट्टी, डॉ. नंदकुमार जयराम आणि डॉ. अलेक्झांडर थॉमस यांच्यासह डॉक्टरांचे एक प्रमुख पॅनेल केंद्राच्या कार्यात तांत्रिक सहाय्य करेल. डॉक्टर आणि नर्सिंग सहाय्य करणारे सर्व कर्मचारी कर्नाटक सरकार पुरवतील. यासाठी फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्ज लिमिटेड च्या सहाय्यक कंपनीने फेयरफेक्स इंडिया होल्डिंग कॉर्पोरेशनमार्फत अर्थसहाय्य दिले आहे. कॅनडास्थित गटाने भारतात कोविड -१९ साठी मदतमदत म्हणून ५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (३७ कोटी रुपये) देणार असल्याचे सांगितले आहे, “असे बीआयएएलच्या प्रवक्त्याने सांगितले. आहे.









