बेळगाव : कोणत्याही नैसर्गिक आपत्तीवेळी किंवा साथीच्या आजारात मदतीचा हात पुढे करणाऱया युनियन बँक रिटायर्ड असोसिएशनच्या सदस्यांनी जनकल्याण सेवा ट्रस्टला 25 हजार रुपयांची देणगी दिली.
सदर ट्रस्टतर्फे रमा केशव लॉज आणि संत मीरा शाळेमध्ये कोविड रुग्णांवर माफक दरात औषधोपचार करण्यात येत आहेत. रुग्णांची संख्या लक्षात घेता निधीची नितांत गरज आहे. हे लक्षात घेऊन युनियन बँक कर्मचाऱयांनी निवृत्तीनंतर एकत्र येऊन स्थापन केलेल्या युनियन बँक रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे ही देणगी दिली. असोसिएशनचे ज्ये÷ पदाधिकारी आप्पाजी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत बोंदे, कोकटनूर, नेरसेकर, गोरबाळकर, लठ्ठे व अध्यापक यांनी ट्रस्टचे पदाधिकारी परमेश्वर हेगडे यांच्याकडे 25 हजारांचा धनादेश सुपूर्द केला.









